महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जनतेपेक्षा मंत्री, आमदारच महत्त्वाचे का?

10:19 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिवेशनामुळे फॉगिंग मशीनची खरेदी : मनपाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप

Advertisement

बेळगाव : पावसाळ्यापूर्वी साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी फॉगिंग मशीनची मागणी करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने केवळ वेळकाढूपणा केला होता. मध्यंतरी घेतलेल्या फॉगिंग मशीन काही दिवसांतच खराब झाल्या. त्यानंतर आता अधिवेशन आहे म्हणून फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिवेशन असल्यामुळे मंत्री, आमदार, अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. त्यांना कोणताही आजार होऊ नये यासाठी आता महापालिका फवारणी करणार आहे. महनीय व्यक्ती इतकीच सर्वसामान्य जनताही महत्त्वाची आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला काहीही झाले तरी चालते, मात्र मंत्री-महोदयांना काही होऊ नये यासाठीच महापालिका प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

फॉगिंग मशीनच नाही तर शहरांतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे ख•s पडले होते. ते ख•s देखील बुजविण्यात आले आहेत. याचबरोबर रंगरंगोटी करण्यात आली आहे. जर अशाप्रकारे महानगरपालिका कार्य करत असेल तर येथील जनतेने काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनता हालअपेष्टा सोसते आणि जनतेच्या पैशावरच मंत्री, आमदार चंगळ करत असतात, असा आरोपदेखील होत आहे. महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी आता आठ फॉगिंग मशीन खरेदी केल्या आहेत. मग यापूर्वी का खरेदी करण्यात आल्या नाहीत. नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्याची जोरदार मागणी केली होती. पण त्याकडे म्हणावे तसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र आता अचानक कोणत्या रकमेतून खरेदी करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बऱ्याचवेळा निधी नाही, असे सांगितले जाते. मात्र मंत्री किंवा खासदार आल्यानंतर निधी कोठून येतो? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article