मंत्री उदय सामंत यांचा शब्द आला कामी, ज्येष्ठासह महिलांचे एसटीचे तिकीट झाले कमी !
आजपासून शहरी बसमध्ये महिलांना ・हाफ तिकिट'
-ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना लागू
-शहरी बसच्या तिकिटात 50 टक्के सवलत
पतिनिधी
रत्नागिरी
एसटीच्या शहरी बससेवेसाठी महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना अंमलात आणाव्यात, असा शासन निर्णय करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता 75 पेक्षा जास्त वय असणाऱया ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या शहरी बससेवेतून मोफत पवास करता येणार आहे. तर 65 ते 75 वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि सर्व महिलांना एसटीच्या शहरी बससेवत अर्ध्या तिकिटावर पवास करण्यात येणार आहे.
उदय सांमतांनी दिलेला शब्द केला पूर्ण
शहरी बस वाहतूक सेवेत ग्रामीण भागातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळण्या मार्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी मोकळा केला आहे. शहरी बसने पवास करणाऱया महिलांना 50 टक्के सवलताया मागणा मंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून त्यांया पाठपुराव्याला यश आले आहे.