मंत्री उदय सामंतांच्या प्रचाराचा धडाका
सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासातून रत्नागिरीचा कायापालट करण्याचा नारा
रत्नागिरी :
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी गावागावात सभांचा जोरदार धडाका सुरू ठेवला आहे. आपण रत्नागिरीच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासातून रत्नागिरीचा कायापालट करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या गावागावात सभा सुरू आहेत. या सभांना जोरदार प्रतिसाद लाभत आहे. राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर रत्नागिरीत १९ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आणण्यात यश आले असून त्यातून ३० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
डोर्ले-शिवार आंबेरे येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नंदकुमार मोहिते, दादा दळी, सुशांत पाटकर प्रकाश पवार, नारायण आग्रे, तानाजी कुळ्ये, विजय चव्हाण, जितेंद्र शिर्सेकर, संतोष तोडणकर, अमोल मोहिते, सरपंच राजा रोकडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.