मंत्री सिक्वेरा यांच्यावर दिल्लीत उपचार सुरु
01:06 PM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मडगाव : पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे आजारी असून त्यांच्यावर दिल्लीतील इस्पितळात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने दिल्लीला नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली. मंत्री आलेक्स सिक्वेरा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते राय येथील घरी परतले होते. मात्र, बुधवारी रात्री पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने दिल्लीला हलविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement