महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री सतीश जारकीहोळींनी घेतला जैन मुनींचा आशीर्वाद

11:10 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावात आयोजित करण्यात आलेल्या श्री मद्देवाधीदेव श्री भगवान 1008 आदिनाथ तीर्थंकरांच्या जीन मंदिराच्या शिखरमानस्तंभोपुरी श्री जीनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाग घेतला. त्यांनी 108 बालाचार्य सिद्धसेन मुनी यांचा आशीर्वाद घेऊन मार्गदर्शन घेतले. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, जैन धर्म हा शांती व सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहे. उत्तम संस्कार आणि जीवनमूल्यांमुळे जैन धर्माचा सर्वत्र गौरव केला जातो. देशामध्ये जैन समुदाय धार्मिक कार्यामुळेच सर्वांच्या आदराला पात्र ठरला आहे. ही परंपरा अशीच पुढेही कायम राहावी, अहिंसावादी राहून समाजासाठी मार्गदर्शक राहावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जैन समाजातर्फे मंत्री सतीश जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार शाम घाटगे, मोहन शहा, अमरेगौड बयुपूर, अभिनंदन पाटील, अशोक मगदूम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article