मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे जल्लोषात भव्य स्वागत
५१ जेसीबी,२ क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव
ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतशबाजी
खारेपाटण -
आमदार नितेश राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाल्यानंतर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या नितेश राणे यांचे खारेपाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 51 जेसीबी,२ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत झालेल्या या स्वागता वेळी ढोल ताशांचा गजरही करण्यात आला. नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..जय श्रीराम,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ.अजित गोगटे, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष गोट्या सावंत, मनोज रावराणे, जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी नगराध्यक्ष समिर नलावडे, अशोक सावंत,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संतोष कानडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बॅंक संचालक समीर सावंत, बाळा जठार,भालचंद्र साठे,संदीप साटम,बंड्या नारकर,रमाकांत राऊत,भाग्यलक्ष्मी साटम हर्षदा वाळके, तन्वी मोदी, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे,संजय कामतेकर, महेश सावंत, शिशिर परुळेकर, संजय देसाई, राजू जठार वागदे सरपंच संदीप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, लक्ष्मण घाडीगावकर,सोनू सावंत, दामू सावंत आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.खारेपाटण येथे उभारण्यात आलेल्या स्टेजवर श्री राणे राणे यांनी शुभेच्छा ही स्वीकारल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनीही नितेश राणे यांचे स्वागत केले.