Hasan Musrif | मोठा भाऊ होणार म्हणुन केलेले वक्तव्य मंत्री मुश्रीफांनी वास्तवात उतरवले
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी ‘मोठा भाऊ’; हसन मुश्रीफांचे वक्तव्य ठरले खरे
कोल्हापुर- कोल्हापुर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रसला अवघ्या चार जागेमध्ये समाधान मानावे लागले. पण जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी मोठा भाऊ असेल असे वक्तव्य मंत्री मुश्राफांनी वांरवार केले होते. अखेर सोमवारी झालेल्या मतमोजणीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रसने मोठा भाऊ असल्याचं दाखवुन दिले आहे. त्यामुळे नामदार मुश्राफांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रसला ११ जागांमध्ये समाधान मानावे लागले आहे. कॉंग्रस भाजपला प्रत्येकी १४ मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला १० जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना ११ जागा मिळाल्या होत्या .
नुकताच झालेल्या कोल्हापुर महापालिकेच्या निवडणुकीत १५ जागेवरुन ४ जागेवर आली. पण दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुर्वी मंत्री हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलताना सतत जिल्हा परिषेदेत राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असेल अशी प्रतिक्रिया देत होते.
या पार्श्वभुमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नसतानाही राष्ट्रवादी कॉंग्रसने ( अजित पवार गट ) २० जागा मिळवत मोठा भाऊ होऊन दाखवला आहे.त्यामुळे नामदार मुश्राफांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.