शक्तिपीठ महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाहीः मंत्री मुश्रीफ
कॅन्सर मुक्त करण्यासाठी महिलांना लस देणार : महिलांना कवच कुंडलं देण्याचा आमचा प्रयत्न : ७५० किमी वाशिम जिल्हा, लोकांना न्याय देणं शक्य नसतं, म्हणून पालकमंत्री पद सोडलं : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूरः
लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग आहे, तिथून मतदानामध्ये आम्हाला कमी आकडेवारी प्राप्त झालेली आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला खूप मोठा विरोध होता. विधानसभा निवडणुकीत देखील मला दोन ते तीन ठिकाणी अडवण्यात आले होते. शेतकरी तयार झाले असतील, त्यांना जास्त किंमत मिळाली असेल, तर या लोकशाहीत आता लोकांना ठरवायचं आहे. कोणाला रस्ता हवा की कोणाला नको. आम्ही लोकांच्या इच्छे खातर त्यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला. पण आज त्याच लोकांना रस्ता हवा असेल चांगला मोबदला मिळत असेल, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला सांगावं. लोकांच्या इच्छेला मान आणि सन्मान देणारी आम्ही आहोत. असे वैद्यकिय शिक्षण मंत्री म्हणाले.
पुढे मंत्री मुश्रीफ म्हणाले, ते शक्तीपीठ महामार्गाला विरोध हा पहिला होताच. तिकीट महामार्गाच्या समर्थनार्थ काही शेतकरी एकत्र आले आहेत. नाला हवा आहे, कोणाला नको आहे, मात्र त्यावर निर्णय आता सरकार घेईल. असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
त्यांना वाशिम पालकमंत्रीपदा बद्दल विचारणा झाली असता, ते म्हणाले, माझ्यापासून साडेसातशे किलोमीटर वाशिम जिल्हा आहे. त्या लोकांना न्याय देता येणार नाही हे मी माझे नेते अजित पवार यांना सांगितले होते. आत्तापर्यंत मी वाशिमला गेलेलो नाही. मी प्रजासत्ताक दिनी मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवायचा होता, म्हणून त्या दिवशी मी वाशिमला गेलो. माझ्या भावना मी योग्य ठिकाणी पोचवले आहेत, दुसरी जबाबदारी मला देतील. पण जी जबाबदारी देतील, ती स्वीकारायची पण ती मर्यादित असावी.
पुढे लाडकी बहीण योजने बद्दल बोलताना म्हणाले, लवकरच लाडक्या बहिणींना २१०० रुपये करणार आहोत. लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसवला आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच लाडक्या बहिणी युतीची शासन आणतील.