'त्या' तरुणाच्या घरी जाऊन मंत्री मोहोळांनी केली विचारपूस
मंत्री मुरलीधर मोहोळांनी पोलिसांना ‘त्या’ प्रकरणावरून सुनावले
'त्या' तरुणाच्या घरी जाऊन केली विचारपूस
पुणेः
शिवजयंतीच्या दिवशी पुण्यातील कोथरुड येथे भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे, यातील एक जण अद्याप फरारी आहे. तर ज्या व्यक्तीला मारहाण झाली ती व्यक्ती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम पाहत असल्याची माहिती आली होती.
देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या गुंडांनी मारहाण केली होती.
या संपूर्ण प्रकरणावर मोहोळ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव देवेंद्र जोग असून, तो माझ्या कार्यालयात काम करत नसल्याचेही म्हटले आहे.
पुढे मंत्री मोहोळ म्हणाले, कोथरूड भागातील देवेंद्र जोग हे भाजपचे अनेक वर्षांपासून कार्यकर्ते आहेत. ते माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही. पण जोग यांना ट्रॅफिकमधून जाताना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्याबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. या घटनेतील काही आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. पण पुढे पुण्यातील कोणत्याही भागात अशा घटना घडता कामा नये, त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका मंत्री मोहोळ यांनी या प्रकरणी मांडली.
हे प्रकरण घडल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोग या तरुणाशी व्हिडीओ कॉलवरून संपर्क केला होता. त्यांची विचारपुसही केली होती. त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर सपत्नीक देवेंद्र जोग या तरुणाच्या घरी जाऊन भेट घेऊन विचारपुस केल्याची माहिती समोर आली आहे.