For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री माविन गुदिन्होंकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

12:42 PM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री माविन गुदिन्होंकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण
Advertisement

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात व्हायरल झालेले व्हिडिओ हे केवळ बदनामी करण्यासाठी आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी उत्तम काम करत आहेत. त्यामुळे अशा बनावट आणि आधारहिन व्हिडिओवर लोक विश्वास  ठेवणार नाहीत, असे मत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले आहे. भाजपने राबविलेल्या ‘दर मंगळवारी प्रत्येक मंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद’ उपक्रमांतर्गत काल मंगळवारी मंत्री गुदिन्हो भाजप कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी विविध कार्यकर्त्यांच्या समस्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Advertisement

या उपक्रमामुळे लोकांना प्रत्यक्ष संबंधित मंत्र्याला भेटून आपल्या समस्या, तक्रारी  मांडण्याची संधी मिळते. त्यापैकी तत्काळ सोडविण्यायोग्य काही समस्या असल्यास त्यांचे लगेच निवारण करता येते. अन्य समस्या संबंधित खात्यांच्या प्रमुखांकडे वर्ग करण्यात येतात. हा उपक्रम लोकप्रिय होत असून आतापर्यंत कित्येकजणांनी आपली भेट घेतली. त्यात प्रामुख्याने आपल्या पंचायत खात्याशी संबंधित तक्रारी मांडल्या असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

विद्यमान वाहतूक संचालक आणि त्यांच्या वर्तनाबद्दल लोकांच्या तक्रारी असल्याचे निदर्शनास आणले असता, सध्या ते आजारी असल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत. येत्या सोमवारपासून ते लोकांसाठी उपलब्ध असतील, असे गुदिन्हो यांनी सांगितले. खात्याची गाडी ऊळावर आणण्यासाठी कधीकधी कठोर स्वभावाच्या अधिकाऱ्यांचीही गरज असते. सर्वसामान्य लोकांना ते ऊक्ष वाटत असले तरी त्यांची कार्यपद्धती आदर्श असते, विद्यमान वाहतूक संचालक हे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी त्यांची सेवा कायम ठेवणार आहे. त्यांना काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर अन्य अधिकाऱ्याचा विचार करण्यात येईल, असे गुदिन्हो यांनी संबंधित प्रश्नावर स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.