मंत्री लक्ष्मण सवदी यांना ‘सहकार’
खातेवाटपाची प्रतीक्षा संपली : संतोष लाड यांच्यावर कामगार खात्याची धुरा
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
नवीन मंत्र्यांना खातेवाटपावरून निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळात सामील झालेल्या 19 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. तर दोन मंत्र्यांना खाते बदलून देण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना अपेक्षेप्रमाणे सहकार खाते देण्यात आले आहे. तर मराठा समुदायातील कलघटगीचे आमदार संतोष लाड यांना कामगार खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 दिवसांनी काँग्रेस हायकमांडने खातेवाटप केले आहे. दिल्ली स्तरावरील बैठका आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर खातेवाटपाची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. अनुभव आणि प्रादेशिक संतुलनाच्या आधारावर नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली असून, काही मंत्र्यांच्या खात्यांत बदल करण्यात आले आहेत.
मुनियप्पा, रामलिंगा रेड्डी यांचे खातेबदल
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्री बनलेले के. एच. मुनियप्पा आणि रामलिंगा रे•ाr हे खातेवाटपावर नाराज होते. अन्नपुरवठा खाते दिल्याने नाराज झालेल्या मुनियप्पा यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन खाते बदलून देण्याची विनंती केली होती. तर पाटबंधारे खाते दिल्याने नाराज झालेले रामलिंगा रेड्डी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होते. तथापि, आता त्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, मुनियप्पा यांना अन्न-नागरी पुरवठा खात्याऐवजी समाज कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर मंत्री रामलिंगा रेड्डी यांना पाटबंधारे खात्याऐवजी वन आणि पर्यावरण खाते देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:जवळ ठेवून घेतलेली खाती
अर्थ, संसदीय कामकाज, कर्मचारी व प्रशासन सुधारणा, गुप्तचर, माहिती, कायदा, न्याय आणि मानवाधिकार, कृषी बाजारपेठ, नगर आणि ग्राम नियोजन तसेच बेंगळूर महानगरपालिका अधिकार क्षेत्राबाहेरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, बेंगळूर शहर विकास प्राधिकरण आणि बीएमआरडीए कक्षेतील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व वाटप न झालेली खाती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वत:जवळ ठेवून घ्sतली आहेत.
आर. व्ही. देशपांडे, पोन्नण्णा यापूर्वीचीच जबाबदारी
कोडगू जिल्ह्यातील विराजपेठचे आमदार ए. एस. पोन्नण्णा यांची मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कारवार जिल्ह्यातील हल्याळचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांची प्रशासन सुधारणा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. राज्य सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या दोन्ही आमदारांना यापूर्वी सांभाळलेली जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे.
कोणाला कोणते खाते?
लक्ष्मण सवदी सहकार (कृषी बाजारपेठ वगळून)
संतोष लाड कामगार
शिवराज तंगडगी मागासवर्ग कल्याण, कन्नड-सांस्कृतिक
बसवराज रायरे•ाr उच्च शिक्षण
एच. सी. बालकृष्ण नगरप्रशासन
के. एस. बसवंतप्पा धर्मादाय, मत्स्योद्योग
एन. चेलुवरायस्वामी पाटबंधारे
मधू बंगारप्पा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
एस. एस. मल्लिकार्जुन खाण आणि भू-विज्ञान
बी. नागेंद्र नियोजन आणि सांख्यिकी
पी. एम. नरेंद्रस्वामी कृषी
सी. पुट्टरंगशेट्टी पशुसंगोपन, रेशीम उद्योग
टी. रघुमूर्ती अनुसूचित जमाती कल्याण
रिझवान अर्शद अन्न व नागरी पुरवठा
रुद्रप्पा लमाणी साखर आणि वस्त्राsद्योग
शिवलिंगेगौडा अबकारी
विजयानंद काशप्पनवर लघुउद्योग
जमीर अहमद खान गृहनिर्माण
डॉ. अजय सिंग लघु पाटबंधारे, विज्ञान-तंत्रज्ञान
यु. टी. खादर आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अल्पसंख्याक कल्याण, हज-वक्फ
रामलिंगा रे•ाr वन, पर्यावरण आणि जीवशास्त्र
के. एच. मुनियप्पा समाज कल्याण