महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेनकनहळ्ळी येथील महालक्ष्मीदेवीचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतले दर्शन

11:20 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

बेनकनहळ्ळी, गणेशपूर व ज्योतीनगर येथील महालक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव चालू असताना राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवार दि. 25 रोजी दुपारी आपल्या कुटुंबासह  लक्ष्मीदेवी मूर्तीचे दर्शन घेतले व प्रार्थना केली. त्यांच्या समवेत विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व मृणाल हेब्बाळकर, कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यात्रा कमिटीचे सभासद उपस्थित होते. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत केले. कमिटी सदस्य बाळू देसूरकर, कल्लाप्पा देसूरकर, महेश कोलकार, कल्लाप्पा पाटील व अन्य सभासद उपस्थित होते. यात्रेच्या चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्याने  रस्ते जनतेनी फुलून गेले होते. पाहुण्यांच्या पाहुणचारात प्रत्येक कुटुंब गुंतल्याने घरच्या लोकांनी अद्याप लक्ष्मीचे दर्शन घेतले नाही.

Advertisement

यात्रेचे चार दिवस शिल्लक

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जोरदार पाऊस झाला असता तर जनतेची तारांबळ उडाली असती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. शनिवार दि. 27 हा आजचा यात्रेचा पाचवा दिवस असून अद्याप चार दिवस यात्रेचे शिल्लक आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article