राज्यात महायुतीची सत्ता येऊदे !
श्री देव बांदेश्वर चरणी कार्यकर्त्यांची प्रार्थना ; मंत्री केसरकरांच्या प्रचाराचा शुभारंभ
प्रतिनिधी
बांदा
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्री देव बांदेश्वर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याबरोबरच राज्यात महायुतीची सत्ता येऊ अशी प्रार्थना श्री बांदेश्वर चरणी करण्यात आली. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांक नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, तनुजा वराडकर, रूपाली शिरसाट, दीपलक्ष्मी सावंत, श्रीया केसरकर, देवल येडवे, अर्चना पांगम, मंदार कल्याणकर, शितल राऊळ, शामकांत काणेकर, अशोक सावंत, अक्रम खान, दादू कविटकर, बाबा काणेकर, केदार कणबर्गी, निलेश नाटेकर, भैय्या गोवेकर, सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरु कल्याणकर, साई धारगळकर, निलेश कदम, अक्षय नाटेकर, प्रवीण नाटेकर, राजेश विरनोडकर, राकेश केसरकर, निलेश देसाई, शैलेश केसरकर, भाऊ वाळके, बाळा आकेरकर, सिद्धेश पावसकर, मंदार महाजन, दीपक सावंत, हुसेन मकानदार, निलेश सावंत, अक्षय मयेकर, संदीप बांदेकर, मनोज कल्याणकर, सागर सावंत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.