मंत्री कामत यांचे वीज खात्यावर थेट आरोप
पक्षश्रेष्ठींनी घेतली गंभीर दखल
पणजी : सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी वीज खात्याच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मडगावातील मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांनी थेट सरकारवर आरोप केले, याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे दिगंबर कामत यांची अडचण वाढण्याची शक्मयता आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भाजपमधील काही नेत्यांनी दिगंबर कामत यांच्या या वागण्याविऊद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकारमध्ये असताना आपल्या सरकारच्या विरोधात आयोजित मोर्चामध्ये दिगंबर कामत हे खुद्द मंत्री असतानाही सहभागी झाल्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दिगंबर कामत यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती काय? किंवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची परवानगी घेतली होती काय, याबाबतची विचारणा आता सुरू होणार आहे.
मंत्री असूनही थेट आंदोलनात?
भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले दिगंबर कामत हे आपल्याच सरकारच्या विरोधात जनतेच्या आंदोलनात सहभागी झाल्याने हा सरकारच्या विरोधातील शिस्तभंगाचा प्रकार ठरतो.
कात्रणे पोहोचली दिल्लीला
हा मुद्दा गृहीत धरून दामू नाईक यांनी दिगंबर कामत यांना किंवा मुख्यमंत्र्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांनीही त्यांना कोणतेही प्रŽ उपस्थित केले नसल्याने भाजपच्या काही नेत्यांनी थेट दिल्लीमध्ये संपर्क साधला आणि वृत्तपत्रातील कात्रणे तसेच त्यांचा व्हिडिओ देखील पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे.
सरकारातील भांडणे उघड
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दिगंबर कामत यांना बहुदा दिल्लीमध्ये प्राचारण केले जाण्याची शक्मयता आहे. या प्रकारामुळे भाजपच्या सरकारमध्ये शिस्त नाही आणि सरकारमध्ये मंत्री आपसात उघडपणे भांडतात, असे चित्र उघड झाले. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे वृत्त आहे.