महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा

12:38 PM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमित पाटकर यांची मागणी

Advertisement

पणजी : कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला असून त्यांनी राजीनामा देऊन  चौकशीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी आज गोविंद गावडे यांनी विशेष निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी आरोप केले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या दहा वर्षांपासून भाजप सरकार भ्रष्ट असल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. आज सभापती रमेश तवडकर यांनीही कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांनी ‘विशेष अनुदाना’चा गैरवापर केला आहे, तसे कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात 90 कोटी ऊपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप याच मंत्र्यावर आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. ते भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप पाटकर यांनी केला. यापूर्वी आम्ही मंत्री माविन गुदिन्हो, रोहन खवंटे, विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत. या सर्वांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे पाटकर म्हणाले. मंत्री गावडे घोटाळ्dयात सहभागी असल्याचा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केल्यामुळे भाजपने कारवाई करावी, असे ते म्हणाले. सभापतींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या त्यांच्याच पक्षातील सदस्याचा पर्दाफाश करण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article