For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात मंत्री गोगावले यांची पाहणी

06:23 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात मंत्री गोगावले यांची पाहणी
Advertisement

                             वाई परिसर फलोत्पादनासाठी पोषक

Advertisement

सातारा : राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री  ना. भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व  परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली.या भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी स्ट्रॉबेरी लागवड पद्धती, रोपवाटिका, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली.

स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. फलोत्पादन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ओझर्डे परिसरात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी ठरत असल्याचे सांगत, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व सुधारित रोपांचा वापर करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले.

Advertisement

महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून, स्ट्रॉबेरी, फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट, पी.एम. एफ.ई. योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी प्रगतीशील शेतकरी सागर फाटक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.