मंत्री दीपक केसरकरांच्या झंझावाती प्रचाराला सुरुवात
सावंतवाडीत डोअर टू डोअर प्रचार सुरु
सावंतवाडी : प्रतिनिधी
शहरात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सालईवाडा, जुना बाजार, माठेवाडा आदी भागात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डोअर टू डोअर प्रचारास प्रारंभ केला. मंत्री केसरकर विजयाचा चौकार मारणार असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
येथिल श्री दैवज्ञ मंदीर, श्री नरसोबा व श्री अश्वत्थ मारुतीचरणी नतमस्तक होत महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डोअर टू डोअर प्रचारास प्रारंभ केला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे चौथ्यांद्या मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ देत व महायुतीचे राज्य पुन्हा एकदा येऊ देत असं साकडं यावेळी देवदेवतांना घालण्यात आले. घरोघरी जात दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी आवाहन केले गेले. सालईवाडा, जुना बाजार व माठेवाडा परिसरात डोअर टू डोअर प्रचार केला गेला. दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अन्नपूर्णा कोरगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अँड. संजू शिरोडकर, देव्या सुर्याजी, सुनिल डुबळे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, किरण नाटेकर, शिल्पा सावंत, शिवानी पाटकर, ममता बांदेकर, सौ. रांगणेकर, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, नागेश जगताप, संदेश टेमकर, अमित गवंडळकर, वर्धन पोकळे, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर, देवेश पडते, गणेश कुडव, शंकर तारी, मंथन जाधव आदींसह शिवसेना, भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.