मंत्री दीपक केसरकरांनी दिल्या वेंगुर्लेतील व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
वेंगुर्ले (वार्ताहर)-
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीतील भाऊबीज या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेटीत गुलाबपुष्प देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणात वेंगुर्ले शहर बाजारपेठेतील व परिसरातील व्यापारी., दुकान व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, स्टॉलधारक यांसह सर्व दुकाने व व्यापार करणाऱ्या सर्वांना भेटी देत शुभेच्छा देण्यासाठी खास आलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदेश कार्यालय सदस्य शरद चव्हाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद परब यांसह प्रमुख पदाधिकारी यांनी पुष्पहाराने श्री केसरकर यांचे स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणात वेंगुर्ले शहर बाजारपेठेतील व परिसरातील व्यापारी दुकान व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, स्टॉलधारक यांसह सर्व दुकाने व व्यापार करणाऱ्या सर्वांना भेटी देत गुलाबपुष्प देत शुभेच्छा मंत्री दिपक केसरकर यांनी दिल्या. तसेच व्यापारी वर्गाकडून ही दिपक केसरकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या आल्या. या प्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिलीप गिरप, शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम,जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर, युवक तालुका प्रमुख स्वप्नील गावडे, प्रमुख सागर गावडे, सलील नाबर, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मकरंद परब, भाजपाचे प्रमेश कार्यालय सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, तसेच भाजपाचे पदाधिकारी बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, प्रणव वायंगणकर, दादा केळूसकर, प्रशांत खानोलकर, शितल आंगचेकर, वृंदा मोर्डेकर, शिवसेनेचे संतोष परब, सुधीर धुरी, उमेश आरोलकर, प्रभाकर पडते, संजय परब, राजू परब, देवीदास वालावलकर, विशाल राऊळ, प्रेमानंद जाधव, केतन सातार्डेकर, शिवसेनेच्या महिला शहर संघटक अँङ श्रध्दा बावीस्कर-परब, उपशहर संघटक मनाली परब, तालुका महिला युवती सेना प्रमुख योगिता कडुलकर आदींसह भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.