For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार !

03:12 PM Jul 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
Advertisement

राजन तेलींचा इशारा

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजले आहेत. शिक्षण खात्यामध्ये सावळा गोंधळ सुरु आहे . प्राथमिक ,माध्यमिक शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे. भविष्यात अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत . असे असताना या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असलेले दीपक केसरकर नेमके करतात तरी काय ? त्यांना शिक्षण खात्याबद्दल काही कळत नाही का? त्यांच्या या एकंदरीत वागणुकीबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे असा इशारा राजन तेली यांनी आज येथे दिला . त्याबरोबरच कोकणसाठी विशेष शैक्षणिक सुविधांची तरतूद करावी अशी मागणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. या भागाचे शिक्षणमंत्री असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संदर्भात तसे धोरण आखण्यात यावे असे भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तेली यांनी केसरकर यांच्यावर सडकून टीका करताना श्री केसरकर हे शिक्षण मंत्री आहेत असे असताना येथील शाळा व एकंदरीत धोरणाबाबत ते गप्प का आहेत असा सवालही त्यांनी केला आहे . केसरकर सांगत आहेत की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मला त्यांनी उमेदवारीबद्दल सांगितले आहे. पण मी सांगू इच्छितो जर का चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काय घडले हे जर मी उघड केले तर केसरकर निश्चित अडचणीत येतील. असेही तेली यांनी स्पष्ट केले यावेळी एकनाथ नाडकर्णी , अनिल देसाई आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.