महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री दिपक केसरकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

02:28 PM Nov 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्लेतील भाजप युवा मोर्चाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजप युवा मोर्चाची आढावा बैठक जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये महायुतीचे उमेदवार दिपकभाई केसरकर यांनी निवडून आणण्याचा बैठकित एकमुखी ठराव करण्यात आला.विधानसभेच्या अनुषंगाने महायुती प्रचार यंत्रणा , तशीच कार्यकर्ता रचनात्मक कार्यकारणी आणि जबाबदारी याची विस्तृत चर्चा संपन्न झाली. महायुती उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचाराचे नियोजन पंचायत समिती भागात बैठका, खळा बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी महायुतीसाठी कशाप्रकारे काम करायचे याचे विस्तृत मार्गदर्शन युवा मोर्चा कार्यकर्त्यांना केले. जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे यांनी मोठ्या मताधिक्याने आपले महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून आले पाहिजे. त्यासाठी सर्वानी तळागाळात जाऊन काम करूया. आणि दिपकभाईना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणूया असे सांगितले. तसेच वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी कोणीही कितीही प्रयत्न केले तरी आपले महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत तरी युवा मोर्चाने आपले दहा दिवस जास्तीत जास्त तळागाळात आपल्या सरकारच्या योजना काम पोहचण्याचे आहे असे सांगितले. तरी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस वैभव होडावडेकर महायुतीसाठी आपल्या पक्षाची प्रामाणिक राहून सर्वानी एकजुटीने काम करूया राज्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी सर्वानी काम करूया असे सांगून सर्व उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी तालुका सरचिटणीस संकेत धुरी, तालुका उपाध्यक्ष मनोहर तांडेल, राहुल गावडे, सोमा सावंत, प्रीतम सावंत, मारुती दोडशनत्ती, संदीप पाटील, रवींद्र धोंड, अमेय धुरी, दशरथ गडेकर, संतोष सावंत,पंकज राणे,राकेश धुरी,सचिन गावडे,गणपत दाभोलकर, चंद्रकांत चव्हाण,विनीत किनळेकर, सहदेव केरकर, संजय केणी, अमर जबडे, अनंत मठकर, जयेश राऊळ, गौरेष खानोलकर, प्रविण गडेकर, गौरेश खानोलकर, कमलेश करंगूटकर, संदीप पाटील, नितीन लिंगोजी, केतन हंजनकर आदी युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat sindhudurg # news update # konkan update
Next Article