पैसे वाटून फसवणूक करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे
मंत्री दीपक केसरकरांचा विरोधकांवर निशाणा
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी मतदारसंघात मी कोट्यावधी रुपयांची विकास कामे आणली आहेत.असे असताना मला जनतेने बिनविरोध निवडून द्यायला हवे होते. मात्र, काही मंडळी स्वार्थासाठी खोटी नेरेटिव्ह माहिती माझ्याविषयी जनतेत पसरवत आहेत.माझ्यासारखा सक्षम आमदार संपूर्ण महाराष्ट्रात येणार नाही. त्यामुळे जनतेने लुबाडणूक करणाऱ्यांपासून आणि पैसे वाटून जनतेची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी श्री केसरकर यांनी विरोधी उमेदवारांवर टीका केली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर टीका करताना मी त्यांच्यासाठी खूप काही केले आमच्या घरातल्या व्यक्तीसारखे आम्ही त्यांना वागवले. माझ्या पत्नीने त्यांना भाऊ मानले. पण आज साळगावकर नको त्या व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी थोडी तरी माणुसकी ठेवायला हवी होती असे ते म्हणाले. मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोण बाऊन्सर घेऊन असतात, कोणी शेतकऱ्यांना लुबाडले याबद्दलची जंत्री आमच्याकडे आहे. पैसे वाटून काही मंडळी तुम्हाला आमिषे दाखवतील त्यांच्यापासून सावध राहा. काही मंडळी खोटी नॅरेटिव्ह तयार करत आहेत. मी सर्व कामे केली आहेत आणि माझ्यासारखी एवढी मोठी विकासकामे कोणी केली नसतील. माझ्यावर शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी होती. असे असतानाही मी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव असे काम केले आहे. असे काम केले असल्यामुळे उलट मला जनतेने बिनविरोध निवडून द्यायला हवे होते . मात्र विरोधक स्वार्थासाठी खोटी काही माहिती पसरवत आहेत. मात्र येथील जनतेचे प्रेम माझ्या सदैव पाठीशी आहे. मी येत्या दोन-तीन दिवसात प्रचाराचा शुभारंभ करणार आहे असेही ते म्हणाले.