महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्य देण्यासाठी कामाला लागा- मंत्री चंद्रकांत पाटील
इस्लामपूर प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनांत आणि घरांघरांत पोहोचूया. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकहिताच्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व जनते समोर मांडू. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या योजना, तीन तलाक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झालेले समाधाचे वातावरण , तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली मदत याचबरोबर जनहितासाठी केलेले प्रत्येक काम हे लोकांपर्यंत पोहोचवून आपण सर्वांनी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय करून कामाला लागा असे आवाहन नामदार चंद्रकातदादा पाटील यांनी केले .
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इस्लामपूर मतदारसंघामध्ये बैठका घेतल्या तेव्हा शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे शिवसैनिक व पदाधिक्रायांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व घटक पक्ष व मित्र पक्ष यांच्या नेते मंडळींनी आपली भूमिका जाहीर केली.यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले की इथे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी विरोधक एकत्र आहोत . आणि आम्ही सर्वजण देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना 2019 पेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत ..
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले ,आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू. गत निवडणुकीमध्ये 80 हजाराचे मताधिक्य होतं ते टिकवून किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी जातीनिशी काम करू.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,मा.राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील , भाजपाचे नेते राहुलदादा महाडिक , हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी,पै.भिमराव माने,पै.पृथ्वीराज पवार,नंदकिशोर निळकंठ, महीला आघाडी संपर्क प्रमुख सुनिता मोरे,जिल्हाप्रमुख अर्चना माळी,तालुकाप्रमुख प्रणाली लोंढे,शहर प्रमुख सतिश पाटील व शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.