आपली वाताहात कशामुळे झाली यांच उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावं- मंत्री चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी अवस्था आता झाली आहे ती २०१९ नंतरही युती राहीली असती तर झाली नसती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी वाताहत झाली त्याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्ला भाजपचे नेते आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. आज ते कोल्हापूरात बोलत होते.
आपल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेच्या निव़डणुकांमध्ये मिळालेल्या य़श अपयशावरही त्यांनी भाष्य केले. तसेच विरोधकांकडून वारंवार होत असलेल्या टिकांवरही त्यांनी उत्तर दिले.
हि वाताहत कशामुळे ? उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावं...
लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी फक्त ९ जागा मिळाल्या आहेत असं सांगताना २०१९ मध्ये त्यांना मिळालेल्या जागांच्या कितीतरी कमी आहेत. शिवसेनेचा फायदा मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेऊन चांगल्या जागा मिळवल्या असल्याचं त्यांनी दावा केला आहे. तसचे भाजप आणि शिवसेनेचे २०१९ मधील युती पुढेही चालू राहील असती तर चित्र काहीस वेगळं होतं. त्यानंतर शिवसेनेची जी वाताहात झाली कि कशामुळे झाली यांचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरे यांनी करणं गरजेच असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मोहन भागवत हे सगळ्यांचे पालक....
राष्ट्रिय स्वयंसेवक प्रमुख मोहन भागवत यांनी सरकारवरिल केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मोहन भागवत हे आमचे पालक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत असल्यानं त्यांना याविषयी विचारण्यात आल्यावर विनोद तावडे हे खुपच कर्तृत्वानं व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व ठरवेल त्यांना काय द्यायचं . त्यांच्या बाबतीत खूप ऑप्शन्स चर्चिले जात असून काहीही झाले तरी मोठेच होतील.असेही त्यांनी म्हटलं आहे.