For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री बी. नागेंद्र यांचा अखेर राजीनामा

06:48 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्री बी  नागेंद्र यांचा अखेर राजीनामा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

Advertisement

मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू असतानाच विरोधी पक्षाकडून तीव्र दबाव आल्याने बी. नागेंद्र यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. नागेंद्र यांच्यावर वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणात आरोप असल्याने भाजप नेत्यांनी तीव्र आंदोलन केले. रायचूर ते बळ्ळारी पदयात्रा काढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस कोंडी होऊ नये यासाठी नागेंद्र यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याद्वारे डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील पहिली ‘विकेट’ पडली आहे.

विधानसौध येथे आयोजित पत्रकार परिषदेत नागेंद्र यांनी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पक्षाची कोंडी होऊ नये यासाठी स्वेच्छेने मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत. आमदारपदाचाही राजीनामा देईन. जनतेच्या न्यायालयात येऊन सर्व गोष्टींना सामोरे जाऊया, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. राजीनाम्याच्या घोषणेनंतर त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन राजीनामापत्र सादर केले. शिवकुमार यांनी ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविले आहे.

Advertisement

मंत्रिमंडळ विस्तार आणि बी. नागेंद्र यांच्याविरोधात भाजपने हाती घेतलेले आंदोलन यासंबंधी चर्चा करण्यासाठी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवी दिल्लीत हायकमांडची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, वरिष्ठांकडून पक्ष आणि सरकारच्या हितासाठी नागेंद्र यांनी राजीनामा देणे योग्य असा संदेश आला होता, असे समजते.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागलीच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. मंत्रिमंडळात नागेंद्र यांच्या समावेशाला भाजप व निजदने तीव्र विरोध केला. अधिवेशनापूर्वी नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अधिवेशनातही भाजपने नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अधिवेशन गदारोळामुळे गाजले. अखेर सरकारने अधिवेशन तीन दिवस आधीच गुंडाळले. नागेंद्र यांना राजीनामा देण्याची गरज नाही, अशी भूमिका सरकारने घेतल्याने भाजपने 1 सप्टेंबरपासून रायचूर ते बळ्ळारी पदयात्रा काढण्याची घोषणा केली. भाजपच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत नागेंद्र यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 आमदारपदाचाही राजीनामा देईन, जनतेसमोर जाऊया!

आमदार पदाचाही राजीनामा देतो, जनतेसमोर जाऊया, असे आव्हान बी. नागेंद्र यांनी भाजपचे आमदार बी. श्रीरामुलू आणि जनार्दन रे•ाr यांना दिले. हिंमत असेल तर काँग्रेस पक्षाचे आव्हान स्वीकारा. तुमच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. ईडी, सीबीआयला घाबरत नाही. मी या खटल्यात आरोपमुक्त होईन, असे नागेंद्र यांनी म्हटले आहे.

राजीनाम्याची घोषणा अन् अश्रु अनावर

विरोधी पक्षाकडून दबाव वाढल्याने आणि वरिष्ठांच्या सूचनेवरून क्रीडा-युवा सक्षमीकरण व अनुसूचित जमाती कल्याण खात्याने मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा करताना ते भावूक झाले अन् त्यांना अश्रु अनावर झाले.

 जनतेच्या रोषापुढे शरणागती : आर. अशोक

वाल्मिकी विकास निगममधील अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या 187 कोटी रुपयांची लूट करणाऱ्या बी. नागेंद्र यांचा बचाव करण्यासाठी सरकारने विधिमंडळाचे अधिवेशनच रद्द केले. अखेर आमच्या संघर्षापुढे हार मानली आहे. जनतेच्या रोषापुढे शरणागती पत्करून नागेंद्र यांनी राजीनामा दिला आहे. भाजपच्या पदयात्रेच्या घोषणेमुळे भयभीत होऊन काँग्रेस सरकारने नागेंद्र यांचा राजीनामा घेतला घेऊन स्वत:ची प्रतिष्ठा काही प्रमाणात वाचविली आहे.

एकाच गैरव्यवहार प्रकरणी दोनदा राजीनामा

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना बी. नागेंद्र यांच्यावर महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणात आरोप झाला होता. त्यामुळे त्यांनी 6 जून 2024 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, 3 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, विरोधी पक्षांनी याला तीव्र विरोध करत नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे, नागेंद्र यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. अशाप्रकारे, त्यांनी एकाच गैरव्यवहार प्रकरणात दोनदा मंत्रिपद गमावले आहे.

Advertisement
Tags :

.