For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वामध्ये मंत्र्याचे अपहरण

06:47 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मंत्र्याचे अपहरण
Advertisement

पेशावर: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे प्रांतीय मंत्री फजल शकूर खान यांचे अपहरण झाले आहे. तर मलाकंदमध्ये पक्षाचे आणखी एक मंत्री शकील अहमद यांच्यावर गोळीबार झाला. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीवरून पीटीआय 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबामध्sय मोर्चा काढण्याची तयारी करत असताना या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानचे सरकार अन् सैन्य पीटीआयचे नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप आहे. अशाप्रकारच्या घटनांनंतरही मोर्चा रोखण्यात येणार नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.

Advertisement

फजल शकूर खान यांच्या वाहनाला पेशावर मोटरवे टोलनाक्यानजीक चेहरे झाकून घेतलेल्या लोकांनी रोखले, या लोकांकडे एके-47 रायफल्स होत्या. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला असून यात हल्लेखोर वाहनाच्या एका टायरवर गोळी झाडताना दिसून येतात. हल्लेखोरांनी शस्त्राच्या बळावर फजल शकूर खान यांना वाहनातून बाहेर काढत स्वत:सोबत नेले आहे.

इम्रान यांच्या बहिणीला अटक

Advertisement

इम्रान खान यांची बहिण अलीमा यांना रविवारी लाहौर येथील त्यांच्या निवास्थानातून अटक करण्यात आली. अलीमा या इम्रान यांच्या मुक्ततेच्या मागणीवरून 27 सप्टेंबर रोजीच्या मोर्चात सामील होणार होत्या. 73 वर्षीय इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात कैद आहेत.

Advertisement
Tags :

.