For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिचोलीत खाण कामकाज सुरू

11:36 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिचोलीत खाण कामकाज सुरू
Advertisement

वेदांता सेसा गोवाच्या ब्लॉक 1 चा शुभारंभ

Advertisement

पणजी : वेदांता सेसा गोवाने डिचोली खाण ब्लॉक 1 येथे खाणकामाला सुरूवात केली आहे. आयर्न ओर गोवा- वेदांता सेसा गोवा यांच्या डिचोली धबधबा येथील कार्यालयात एका समारंभात कामकाजाची सुऊवात करण्यात आली. डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, सेसा गोवाचे सीईओ नवीन जाजू, मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर, पंच वासुदेव गावकर आणि दिलीप शेट, पिळगावचे उपसरपंच समीर वायंगणकर, पंच उमाकांत प्रभुगावकर, माजीआमदार नरेश सावळ, ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर, संघटनेचे अन्य सदस्य, सामाजिक नेते आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सेसा गोवाचे कार्यकारी समितीचे अन्य सदस्य, कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक भागीदार देखील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सेसा गोवा-वेदांता लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू म्हणाले, खनिज उत्खननाची सुऊवात, हा एक अतिशय महत्त्वाचा विकास आहे. यामुळे लोकांच्या प्रगतीची आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी नवीन दारे उघडणार आहेत. वेदांता सेसा गोवा समाजाला ‘गिव्हिंग बॅक’ (परत देणे) या भावनेला मूर्त रूप देत राहणार आहे. तसेच सरकारच्या ‘विकसित भारत, विकसित गोवा’च्या ध्येयामध्ये देखील योगदान देत राहणार आहे. प्रदीर्घ काळानंतर खाण व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि राज्यातील लिलाव केलेल्या खाणींच्या कार्यान्वित होण्यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. लिलाव प्रीमियम, रॉयल्टी, डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशनचे योगदान याद्वारे राज्याला महसूल जमा होईल. शिवाय, खाणकाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल, व्यावसायिक वातावरणाला चालना देईल आणि समुदाय, छोटे व्यवसाय, ट्रक, बार्ज मालक, संबंधित सेवा आणि गोव्यातील कंत्राटी कामगारांसह विविध भागधारकांना याचा फायदा होईल, असेही जाजू म्हणाले. सीओओ- मायनिंग, सेसा गोवा, वेदांता लि. कृष्णा रे•ाr, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, आयर्न ओर गोवा, वेदांता सेसा गोवा धीरजकुमार जगदीश यांचीही भाषणे झाली.

Advertisement
Advertisement
Tags :

.