सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये खाण दुर्घटना, 100 हून अधिक जण ठार
06:22 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बांगुई : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकच्या पश्चिम भागात एक सोन्याची खाण खचल्याने 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत कार्यांमध्ये सामील रेडक्रॉसचा स्वयंसेवक आणि एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कॅमरूनच्या सीमेनजीक नाना-माम्बरे भागातील जाम्बोये गावात पारंपरिक सोन्याची खाण खचली. या गावातील बहुसंख्य लोक या खाणीत काम करत होते. आतापर्यंत या दुर्घटनेत 100 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती रेड क्रॉसचे स्वयंसेवक गेरवाइस गानागोरोह यांनी दिली. अद्याप अनेक लोक बेपत्ता आहेत तसेच काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले असल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती जाम्बोये यूथ कौन्सिलचे सदस्य बर्ट्रेंड बे यांग्यू यांनी व्यक्त केली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement