For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्रात मिळाला मिंग राजघराण्याचा खजिना

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
समुद्रात मिळाला मिंग राजघराण्याचा खजिना
Advertisement

दक्षिण चीन समुद्राच्या तळाला चीनच्या मिंग राजघराण्याचा खजिना मिळाला आहे. या ठिकाणी मिंग राजघराण्याची दोन जहाजं बुडाली होती. या बुडालेल्या जहाजांमधून 900 हून अधिक कलाकृती तसेच तांब्याची नाणी आता बाहेर काढण्यात आली आहेत. 2022 मध्ये समुद्रात 4900 फूट खोलवर दोन जहाजांचा शोध लागला होता. तेव्हापासून त्यासंबंधी संशोधन सुरू आहे. दक्षिण चीन समुद्रात हे स्थान चीन आणि फिलिपाईन्स तसेच व्हिएतनामच्या मधोमध आहे. समुद्राखाली ज्या दोन जहाजांचे अवशेष मिळाले आहेत, ते मिंग राजेशाहीच्या 1368-1644 या कालावधीतील असल्याचे सांगण्यात येते. 2023 मध्ये संशोधकांनी शेनहाई योंगशी (डीप सी वॉरियर) नावाने खोल समुद्रात पाणबुडीच्या मदतीने या ठिकाणांचा नकाशा तयार केला होता, त्यानंतर उत्खननाचे कामही सुरू करण्यात आले. या संशोधनाविषयी लाइव सायन्सच्या अहवालात विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

विशेष उपकरणांचा वापर

दोन्ही जहाजांच्या अवशेषांना शोधण्यासाठी पाणबुड्यांनी विशेष प्रकारच्या साधनांचा वापर केला आहे. तसेच संशोधकांनी खास उपकरणांचा वापर केला आहे. प्रारंभिक शोधात जहाजाच्या अवशेषांमधून शेकडो तांब्याची नाणी तसेच चिनी मातीची भांडी सापडली आहेत. जहाजात जिंगडेजेन येथून सामग्री आणली जात होती, याचदरम्यान ते बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

कलाकृती प्राप्त

दुसऱ्या जहाजातून प्राण्यांची शिंगं, लाकडी आणि चिनी मातीची भांडी आणि 38 कलाकृती सापडल्या आहेत. ज्या ठिकाणी हे जहाज आढळून आले आहे ते प्राचीन सागरी रेशीम मार्गादरम्यान आहे. या शोधानंतर व्यापार आणि सांस्कृतिक आदान-प्रदानविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. परंतु जहाज कशामुळे बुडाले याची माहिती मिळू शकलेली नसल्याचे चीनच्या पुरातत्व विभागाचे उपप्रमुख गुआन कियांग यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.