आचरा पोलीस ठाण्याच्या मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदीबढती
03:54 PM Aug 12, 2026 IST | तरुण भारत सिंधुदुर्ग
Advertisement
आचरा प्रतिनिधी : आचरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सौ मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.नेहमी हसतमुख आणि
सहकार्याची भावना असलेल्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कणकवली मालवण कुडाळ त्यानंतर आचरा भागात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. आचरा पोलीस ठाण्यात येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी देसाई यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नाबरोबर, सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थ संदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये विशेष प्रयत्न केले होते.त्यांना उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement