For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिमिक्री करणाऱ्या खासदाराचे उपराष्ट्रपतींकडून अभीष्टचिंतन

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिमिक्री करणाऱ्या खासदाराचे उपराष्ट्रपतींकडून अभीष्टचिंतन
Advertisement

जगदीप धनखड यांनी दाखविले मोठे मन

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मोठे मन दाखवत आपली मिमिक्री (नक्कलबाजी) करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले आहे. अभीष्टचिंतन करण्याबरोबरच त्यांना कुटुंबासमवेत जेवायलाही आमंत्रित केले. उपराष्ट्रपतींकडून प्राप्त झालेल्या या शुभेच्छांमुळे खासदार बॅनर्जी यांनी ‘एक्स’वर त्यांचे विशेष आभार मानले आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी आपल्याला सपत्नीक दिल्लीतील निवासस्थानी जेवायला बोलावले असल्याची पोस्ट बॅनर्जी यांनी ‘एक्स’वर केली आहे. ‘माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल मी माननीय उपराष्ट्रपतींचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पत्नीशी वैयक्तिकरित्या दूरध्वनीवर बोलण्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिल्याने मी भारावून गेलो आहे’, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. अलिकडेच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तृणमूल नेत्याने राज्यसभेच्या अध्यक्षांची नक्कल करून वाद ओढवून घेतला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.