For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलंडमध्ये मिळाला कोट्यावधींचा खजिना

06:28 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
पोलंडमध्ये मिळाला कोट्यावधींचा खजिना
Advertisement

1800-1900 काळातील नाण्यांचा साठा हाती

Advertisement

पुरातत्व विभाग आणि जुन्या गोष्टींमध्ये स्वारस्य असलेल्या लोकांना अनेकदा स्वत:च्या शोधमोहिमेवेळी असे काही हाती लागते जे अत्यंत थक्क करणारे असते. स्जेसकिन एक्सप्लोरेशन ग्रूप असोसिएशनच्या लुकाज इस्टेल्स्की आणि दोन अन्य लोकांनी स्जेसकिननजीक एका जंगली भागात मेटल डिटेक्टर्सच्या मदतीने अत्यंत थक्क करणारा शोध लावला आहे.

ही टीम दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील गोष्टी शोधण्यासाठी जंगलात गेली होती, परंतु या टीमला मोठा खजिनाच हाती लागला आहे. पोलंडमधील असोसिएशनने स्जेसकिननजीक मेटल डिटेक्टरद्वारे हा शोध लावला आहे. जमिनीपासून सुमारे 8 इंच खाली असलेला एक धातूचा डबा त्यांना सापडला आहे.

Advertisement

कॅन सहजपणे तुटला आणि त्याच्या आत शेकडो सोन्याची नाणी दिसून आल्याचे इस्टेल्स्की यांनी सांगितले आहे. स्जेसिन एक्सप्लोरेशन ग्रूप असोसिएशनकडून यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आली असून यात प्रसारित करण्यात आलेल्या छायाचित्रात झाडाखाली कित्येक सोन्याची नाणी दिसून येत आहेत. ही नाणी अत्यंत चांगल्या स्थितीत आढळून आली आहेत. इस्टेल्स्की यांनी हा शोध स्वप्नवत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन गोल्ड एक्स्चेंजनुसार 1933 पूर्वीची ही सोन्याची नाणी अत्यंत दुर्लभ आहेत. मूळ स्वरुपात तयार करण्यात आलेल्या अनेक लाखो नाण्यांपैकी जवळपास सर्वांचा वापर 1800 ते 1900 दरम्यान मोठ्या प्रमाणावर केला जात होता. यातील अनेक नाणी 1930 च्या दशकात संघीय सोने परत मिळविण्याच्या प्रक्रियेंतर्गत वितळविण्यात आले होते. आता काही मूळ नाणीच शिल्लक राहिली आहेत. छायाचित्रांमध्ये 1903 चे 20 डॉलर्सचे सोन्याचे नाणे दिसून येते, समोर लेडी लिबर्टीची प्रतिमा आहे.

ही सोन्याची नाणी जंगलात कशी पोहोचली याचा शोध अद्याप अधिकाऱ्यांना लावता आलेला नाही. दुसऱ्या महायुद्धाशी निगडित ही नाणी असावीत असे इस्टेल्स्की यांचे मानणे आहे. हा खजिना स्थानिक प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहे. स्जेसिन उत्तर-पश्चिम पोलंडमध्ये असून जर्मनीच्या सीमेनजीक तर राजधानी वॉर्सापासून सुमारे 350 मैल अंतरावर आहे.

Advertisement
Tags :

.