टॅटूसाठी कोट्यावधींचा खर्च
महिलेला पाहून वाटते भीती
दोन मुलांची आई असलेल्या कायलाने स्वत:च्या पूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. यामुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. मी आणि माझा जोडीदार टॅटूला पसंत करतो. परंतु उर्वरित लोक आम्हाला ट्रोल करत असतात असे कायलाने सांगितले आहे. कायलाने आतापर्यंत स्वत:च्या शरीरावर 2.7 कोटी रुपये खर्च करून टॅटू काढून घेतले आहेत. तिच्या शरीराचा जवळपास 90 टक्के हिस्सा टॅटूंनी झाकला केला आहे. परंतु तिला स्वत:च्या या निर्णयासाठी टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. काही लोक त्यांना ‘सर्कसचे अजब पात्र’ ठरवत असतात.
इलिनॉइसमध्ये राहणाऱ्या कायलाने अलिकडेच युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. माझे पालनपोषण एका रुढिवादी मोर्मन चर्चमध्ये झाले होते. जेथील नियम अत्यंत कठोर होते. ते अत्यंत कठोर वातावरण होते. मला स्वत:च्या कपडे किंवा लुक्सद्वारे व्यक्त करण्याची अनुमती नव्हती. परंतु मोठी होऊ लागताच मी स्वत:ला व्यक्त करू लागले आणि टॅटू काढून घेणे माझ्या जीवनाचा हिस्सा ठरला. आता आठवड्यात दोनवेळा मी टॅटू काढून घेते, असे ती सांगते.
सहन करावा लागतो भेदभाव
टॅटूमुळे मला आणि माझा जोडीदार वँपिरो यांना भेदभावाला सामोरे जावे लागते. आम्हाला केवळ फेस टॅटूमुळे रेस्टॉरंटमधून बाहेर काढण्यात आले होते. लोक आम्हाला वाईट आईवडिल ठरवितात, परंतु आम्ही उर्वरित लोकांप्रमाणेच अत्यंत सामान्य आहोत असे कायला सांगते.
ऑनलाइन ट्रोलिंग
कायलाला सोशल मीडियावरही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात. टॅटूमुळे स्वत:ला बिघडवून घेतलेस अशी टीका तिच्यावर होत असते. परंतु ती याकडे दुर्लक्ष करते. हा लुक मला पसंत असल्याचे तिने म्हटले आहे. काही लोक तिचे समर्थन देखील करतात.