मिली अन् डेव्हिड हार्बर नव्या सिरीजसाठी एकत्र
स्ट्रेंचर थिंग्स’ फेम अभिनेत्री मिली बॉबी ब्राउन अन् अभिनेता डेव्हिड हार्बर यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम लाभले होते. या सीरिजमध्sय मिलीने ‘इलेवन’ तर डेव्हिडने ‘जिम हॉपर’ची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा हे दोघेही एकत्र अभिनय करणार आहेत. एक नव्या स्पाय ड्रामा सीरिजमध्ये मिली अन् डेव्हिड काम करणार आहे.
हा स्पाय ड्रामा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून तो पॉल वॉर्नर यांची कादंबरी ‘ए स्पाय इन द ब्लड’वर आधारित असेल. या सीरिजमध्ये डेव्हिड हा मॅट वुल्फच्या भूमिकेत असेल, जो एफबीआयचा माजी एजंट होता आणि आता सुरक्षा सल्लागार झाला आहे. मॅटला पुन्हा एफबीआयमध्ये जावे लागणार असल्याचे यात दाखविण्यात येईल. सीरिजमध्ये मॅटची मुलगी रेबेकाची भूमिका मिली साकारणार असून ती देखील एक एफबीआय एजंट आहे. पिता अन् मुलीचे नाते फारसे चांगले नसते. परंतु अचानक मुलगी गायब होते, यानंतर पित्याला स्वत:च्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतावे लागते.