For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मिल्की मिस्ट’ आयपीओ सूचीबद्ध

06:48 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मिल्की मिस्ट’ आयपीओ सूचीबद्ध
Advertisement

गुंतवणूकदारांना प्रति लॉट 4440 पर्यंत नफा : बीएसई-एनएसईवर आयपीओ झाला सूचीबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

डेअरी आणि पॅकेज्ड फूड कंपनी मिल्की मिस्ट डेअरी फूडने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा प्राप्त करुन दिला. हे शेअर्स मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी बीएसई आणि एनएसईवर सुमारे 18 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. दोन्ही एक्सचेंजवर 140 रुपयांच्या इश्यू किमतीऐवजी ते 165 रुपयांना लिस्ट झाले. म्हणजेच, प्रत्येक लिस्टिंगमागे प्रति शेअर सुमारे 25 रुपयांचा नफा मिळाला.

Advertisement

मिल्की मिस्टच्या गुंतवणूकदारांचा मोठा पैसा

मिल्की मिस्टच्या शेअर्सच्या लिस्टिंगमुळे मोठी तेजी नोंदवली जात आहे. लिस्टिंगनंतर शेअर्सवर 10 टक्केचा अप्पर सर्किट लागू करण्यात आला आहे. मिल्की मिस्टचे शेअर्स एनएसएइवर 181.50 रुपयांना ट्रेड करत आहेत. त्यानुसार, हे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा सुमारे 30 टक्क्यांनी जास्त किमतीला ट्रेड करत आहेत. 107 शेअर्सच्या लॉट्सच्या बाबतीत, गुंतवणूकदारांनी प्रति लॉट 4440.5 रुपयांचा नफा कमावला आहे. लिस्टिंगनंतर, कंपनीचे बाजार भांडवल वाढून 13,972.66 कोटी रुपये झाले आहे.

मिल्की मिस्ट डेअरी फूड आयपीओचा आकार 1553 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 1428 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 125 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. या इश्यूला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच कारणामुळे शेवटच्या दिवशी आयपीओ 59.08 पटींनी ओव्हरसबक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांकडून आयपीओ 8.86 पट सबक्राईब झाला.

Advertisement
Tags :

.