For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर... आज मिळणार दूध दरवाढ

06:22 AM Jul 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर    आज मिळणार दूध दरवाढ
Advertisement

पणजी /विशेष प्रतिनिधी

Advertisement

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून आज फोंडा येथे आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूध उत्पादकांना फार मोठ्या सवलती त्याचबरोबर दूध दरात वाढ करून देण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार फोंडा येथील राजीव कला मंदिर येथे आज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या या समारंभात दूध दरवाढ जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना अशी मिळणार दूध दरवाढ

गाईच्या दुधावर प्रति लिटर सहा रुपये

म्हशीच्या दुधावर प्रति लिटर दहा रुपये

आधारभूत रक्कमेचाही मिळणार लाभ

या दरवाढीसाठीचे सारे पैसे गोवा डेरीकडे गोवा सरकार अदा करणार आहे. शेतक्रयांनी गोवा डेरीला दूध दिल्यानंतर त्यांना प्रति लिटर ही दरवाढ प्राप्त होईल. याशिवाय दूध उत्पादकांना आधारभूत रक्कम जी 40 टक्के आहे तिचा लाभ देखील दिला जाणार आहे. मात्र निवडणूक होईपर्यंत गोवा डेरीने दूध दरवाढ करू नये, अशी सूचना देखील मुख्यमंत्री गोवा डेअरीला करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.