माइली सायरसला मिळाला पुरस्कार
डिस्ने लिजेंडच्या स्वरुपात सन्मानित
अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री माइली सायरसला अलिकडेच सर्वात कमी वयाची डिस्ने लिजेंड म्हणून गौरविण्यात आले आहे. डिस्नेमध्ये मोठा प्रभाव पाडत योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार राखीव आहे. हा पुरस्कार माइली सायरसच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरला आहे. माइलीने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात ‘हैन्ना मॉन्टेना’च्या भूमिकेतून केली होती.
माइलीने या पुरस्कार सोहळ्यादरम्यान यशासोबत येणारी भीती आणि आव्हानांविषयी म्हणणे मांडले. मी सर्वांना डिस्ने लिजेंडविषयी एक छोटेसे रहस्य सांगू इच्छिते. मी जे सांगू इच्छिते, ते खरं तर कुणी ऐकू नये. लिजेंड देखील घाबरत असतात असे मी सांगू इच्छिते. आता मी घाबरलेली आहे, परंतु घाबरूनही सर्वोत्तम कामगिरी करणे हेच लिजेंड व्यक्तींचे वैशिष्ट्या असते असे माइलीने उपस्थित समुदायाला संबोधित करताना म्हटले आहे.
माइलीने यावेळी ‘हैन्ना मॉन्टेना’च्या रुपात स्वत:च्या भूमिकेबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच हा पुरस्कार तिने स्वत:ची भूमिका आणि चाहत्यांना समर्पित केला आहे. डिस्ने लिजेंड्स पुरस्कार कंपनीला पुढे नेण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांना देण्यात येतो. माइली ही अत्यंत कमी वयात हैन्ना मॉन्टेना या सीरिजसोबत जोडली गेली होती. या सीरिजने जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या शोच्या द्वारेच साइरसने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.