मिडवेस्टचा आयपीओ आज होणार लाँच
नवी दिल्ली :
दोन आयपीओ भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये मिडवेस्ट आणि कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स यांचा समावेश आहे. मिडवेस्ट 451 कोटी रुपये तर कॅनरा 2517 कोटी रुपये आयपीओतून उभारणार आहे.
सोलार गॅस सेवा व इंजिनियरड स्टोन उद्योगात असणाऱ्या मिडवेस्ट यांचा आयपीओ 15 ऑक्टोबरला गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. 451 कोटी रूपये आयपीओअंतर्गत उभारले जातील. 23 लाख ताजे समभाग सादर केले जाणार असून सोबत 19 लाख समभाग हे ऑफर फॉर सेलतंर्गत सादर केले जातील. कंपनीने समभागाची किंमत 1014-1065 रूपये प्रति समभाग निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये 14 समभाग असणार असून त्याकरता 14910 रूपये गुंतवावे लागणार आहेत. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 50 टक्के तर 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी व 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला आयपीओ सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स
कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स यांचा आयपीओ मंगळवारी गुंतवणूकीसाठी बंद झाला असून तो पूर्णपणे सबस्क्राइब झाला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी हा आयपीओ 9 टक्के इतका सब्रकॉईब झाला होता. 2517 कोटी रूपयांचा हा आयपीओ असणार असून समभागाची किमत 100-106 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आली आहे. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.95 पट आयपीओ सबस्क्राइब केला असून रिटेल गुंतवणूकदारांनी 35 टक्के सबस्क्राइब केला होता. प्रवर्तकांकडून 23.75 कोटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जातील. यात कॅनरा बँकेची हिस्सेदारी 51 टक्के आणि एचएसबीसी समूहाच्या एचएसबीसी इन्शुरन्सची 26 टक्के हिस्सेदारी आहे.