For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंढरपूरमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न; उपमाहिती कार्यालय - पाणी तपासणी प्रयोगशाळा फोडली

01:57 PM Mar 09, 2026 IST | NEETA POTDAR
पंढरपूरमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न  उपमाहिती कार्यालय   पाणी तपासणी प्रयोगशाळा फोडली
Advertisement

                         भक्तीमार्ग परिसरात चोरीचे हादरवणारे प्रकार;

Advertisement

पंढरपूर - पंढरपूर येथे सुरक्षितता केवळ नावालाच उरली असून रविवार, ८मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चक्क भक्तीमार्ग परिसरातील पत्रकार नगर येथे असलेले उपमाहिती कार्यालय आणि पाणी तपासणी प्रयोगशाळा फोडली. याठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही राज्य शासनाच्या कार्यालयात काहीच हाती न - लागल्याने चोरटे नुकसान करून परत गेले.

पांडुरंगाच्या पावन नगरीत सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाहीच, पण आता समाजाला जागेकरण्यासाठी काम करणारे पत्रकार आणि त्यांचे सरकारी कार्यालय देखील सुरक्षित राहिलेले नाही. या दोन्ही कार्यालयात संगणक तसेच सहाय्यक माहिती अधिकारी अविनाश घरगडे यांचा कॅमेरा, वृत्तपत्राची रद्दी होती, मात्र चोरट्यांनी या कशालाच हात लावला नाही, लोखंडी दरवाजे, ग्रील, कड़ी कोयंडा तोडून नुकसान केले आहे. कनकाक्षर हा बंगला भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे यांचा असून तो त्यांनी उपमाहिती कार्यालय व पाणी तपासणी प्रयोगशाळा यांना भाड्याने दिला आहे. डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.