सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर मध्यरात्री छापा 26 जणांवर कारवाई 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली. बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याचे तसेच ग्राहकांकडून महिलांवर नोटा उधळल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत 15 महिला व ग्राहकांची चौकशी करण्यात आली असून 26 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा एकूण 28 लाख 25 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंदे नियमबाह्य डान्सबार तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.
त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने 6 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.15 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव येथील सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान बारमध्ये काही महिला तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत हिंदी व मराठी गाण्यांवर नृत्य करत असल्याचे आढळून आले. तसेच ग्राहकांकडून महिलांच्या अंगावर नोटा उधळल्या जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांसह संबंधित कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या 15 महिला व ग्राहकांची चौकशी करून त्यांची नावे व पत्ते निष्पन्न केले. कारवाईदरम्यान रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा एकूण 28 लाख 25 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बारचा चालक मालक व्यवस्थापक तसेच अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 296 223 3 5 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 आणि 131 तसेच महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे सपोनि श्वेता चव्हाण सपोनि विश्वजीत भोसले मसपोनि शारदा नवनाथ घोळवे सपोनि प्रवीण जर्दै पोहेकॉ प्रविण बापू वाळके पोशि निलेश भारत जानकर पोशि आदित्य चंद्रशेखर कांबळे पोशि अनिल भास्कर पवार तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.