For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगलीत मध्यरात्री थरार! घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

03:53 PM May 25, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत मध्यरात्री थरार  घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
Advertisement

                                सांगलीत घरात घुसून चोरट्याचा हातचलाखीचा प्रकार

Advertisement

सांगली : मिरज तालुक्यातील नांद्रे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल १७हजार ६५० रुपयांचे सोन्याचे गंठन चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे परिसरात भीतीचे बातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी असमा राजू मुजावर (वय २९, रा. इनामपट्टी, वजनकाट्यासमोर, बसगडे रस्ता, नांद्रे, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. असमा मुजावर या शुक्रवारी रात्री आपल्या पतीसमवेत घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्याने अत्यंत चलाखीने महिलेच्यागळ्यातील सोन्याचे गंठन अलगद काढले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

Advertisement

काही वेळानंतर असमा मुजावर यांना गळ्यातील गंठन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.