For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यपूर्वेतील सर्वात मोठा पूल नष्ट

06:36 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यपूर्वेतील सर्वात मोठा पूल नष्ट
Advertisement

इराणला मोठा झटका : इस्रायल-अमेरिकेकडून हवाई हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अलबोर्ज प्रांतातील बी1 पूल नष्ट झाला आहे.  बी1 हा मध्यपूर्वेतील सर्वात उंच पूल होता. या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानचा स्वत:चे शेजरी शहर करजसोबतचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

Advertisement

अमेरिका-इस्रायलच्या या हल्ल्यात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पूलासोबत करज शहराच्या अन्य भागांनाही लक्ष्य करण्यात आल्याने अफरातफरीची स्थिती निर्माण झाली.

इराणी इंजिनियरिंगचा गौरव होता पूल

बी1 पूल हा इराणसाठी केवळ एक वाहतुकीचा मार्ग नव्हता. हा पश्चिम आशियातील सर्वात आधुनिक इंजिनियरिंग प्रकल्पांपैकी एक होता, जो पूर्णपणे इराणी तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात आला होता. हा पूल 1,050 मीटर लांब होता आणि 8 हिस्स्यांमध्ये विभागलेला होता. याचा सर्वात लांब हिस्सा 176 मीटरचा होता. या पूलाला आधारासाठी 136 मीटर उंच एक विशाल स्तंभ निर्माण करण्यात आला होता. या पूलाच्या निर्मितीकरता सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स इतका भरभक्कम खर्च आला होता.

ऐतिहासिक पाश्चर इन्स्टीट्यूटही लक्ष्य

पूल नष्ट होण्यासोबत गुरुवारी इराणच्या प्रसिद्ध ‘पाश्चर इन्स्टीट्यूट’वरील हल्ल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका-इस्रायलने पाश्चर इन्स्टीट्यूटला लक्ष्य केल्याचा आरोप इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी केला. पाश्चर इन्स्टीट्यूट इराणच नव्हे तर पूर्ण पश्चिम आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सार्वजनिक आरोग्य तसेच संशोधन केंद्र आहे. याची स्थापना 1920 मध्ये पॅरिसमधील पाश्चर इन्स्टीट्यूट आणि तत्कालीन इराण सरकारदरम्यान एका खास कराराच्या अंतर्गत करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.