For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधानगरी मतदारसंघात दोन एमआयडीसी उभारणार; उद्योग मंत्री सामंत यांचे आश्वासन.

02:04 PM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
राधानगरी मतदारसंघात दोन एमआयडीसी उभारणार  उद्योग मंत्री सामंत यांचे आश्वासन
Minister Uday Sawant
Advertisement

राधानगरीत संजय मंडलिक यांची विराट रॅली

तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राधानगरी मतदारसंघात दोन एमआयडीसी प्रकल्प आचारसंहिते नंतर पाहायला मिळतील. असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. हजारो उपस्थितांनी जल्लोष करत या घोषणेचे स्वागत केले. राधानगरी तालुक्यात संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीच्यावतीने प्रचंड रॅली काढली. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी राधानगरी अक्षरश: फुलून गेले होते. विरोधकांना धडकी भरवणारी ही महारॅली शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले.
मंत्री सामंत म्हणाले, राधानगरीतून निघालेली आजची ही महारॅली म्हणजे महायुतीने या तालुक्यात मुसंडी मारल्याचे दर्शवते. ही रॅली संजय मंडलिक यांच्या विजयाची नांदी ठरेल. या तालुक्याच्या विकासासाठी राज्य सरकार दोन एमआयडीसी प्रकल्प आचारसंहितेनंतर उभारले जातील.

Advertisement

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराज, मैदान म्हटल्यावर नाका -तोंडात माती जाणारच! पण तुम्ही एका पक्षाचा हिस्सा झालात. हे योग्य नाही. निवडणूक लढवायची नसणाऱ्यांनी उमेदवारीची झूल तुमच्या अंगावर टाकून तुम्ही त्यांच्या गळाला लागलात. सन्मानच द्यायचा होता तर राज्यसभा निवडणुकीत छत्रपती शाहूंना खासदार करता आला असते. संभाजी राजे यांना यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने खासदार केले आहे.

महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक म्हणाले, मी फोन उचलत नसल्याची विरोधक टीका करतात ,किमान माझा फोन नंबर तरी जनतेकडे आहे. विरोधी उमेदवारांचा नंबर कोणीही सांगावा.

Advertisement

आमदार प्रकाश अबिटकर म्हणाले, राधानगरी -भुदरगड तालुक्याच्या हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आहेत. त्यांनी मंत्री पदाच्या काळात या दोन तालुक्याला भरभरून निधी दिला आहे. खासदार संजय मंडलिक हे तोच वारसा पुढे चालू ठेवून राधानगरी -भुदरगडच्या विकासात भर घालताहेत. मंडलिकांनी 1750 कोटीचा निधी खेचून आणल्याची माहिती आमदार आबिटकर यांनी देताच टाळ्यांच्या प्रचंड गजर झाला.

बाळासो बेलेकर, दीपक शिरगावकर यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक दीपक शेटी यांनी केले. आभार मनसे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी मानले.

यावेळी बाळासाहेब नवणे, नंदकिशोर सूर्यवंशी, बिद्री साखर संचालक राजेंद्र भाटळे, संभाजी आरडे, दीपक शिरगावकर, दीपक शेटे, बाळासाहेब बेलेकर, मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, निवास रणदिवे, तानाजी चौगले, विश्वनाथ पाटील, सिताराम खाडे, विजय बलुगडे, अरुण जाधव, शामराव भावके, संग्राम पाटील, राधानगरी सरपंच सौ. सविता भाटले, उपसरपंच पप्पू पालकर, विराज अमर मिसाळ या मान्यवरांसह राधानगरी तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.