For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिडकॅप समभाग तेजीवर स्वार 3 : गुंतवणूकदारांच्या पसंतीस

06:22 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
मिडकॅप समभाग तेजीवर स्वार 3   गुंतवणूकदारांच्या पसंतीस
Advertisement

वृत्तसंस्था, नवमी दिल्ली

Advertisement

वर्षाच्या सुरुवातीला मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांतील समभाग हे मोठ्या घसरणीत होते. परंतु आता चित्र बदलले आहे. चांगल्या तिमाही निकालासोबत मजबूत कमाई आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूकीप्रती वाढलेली इच्छाशक्ती या पार्श्वभूमीवर मिडकॅप निर्देशांकांतील समभागांनी चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिल्याचे दिसून आले आहे. येणाऱ्या काळातही या निर्देशांकातील समभागांची कामगिरी चमकदार होऊ शकते, असे तज्ञांना वाटते.

किती टक्के दिला परतावा

Advertisement

वर्षाची सुरुवात झाली तेव्हा मिडकॅप निर्देशांक हा काहीशी निराशादायी कामगिरी करत होता. पण नंतरच्या महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा कल बदलला. यावर्षी मिडकॅप समभागांनी आतापर्यंत 30 ते 50 टक्के इतकी तेजी प्राप्त केलेली दिसून आली आहे. पण नुसती तेजी पाहून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करणे योग्य ठरत नाही. गुंतवणूकदारांनी कंपनीचे मूल्य, व्यवसायाची गुणवत्ता व जोखीम देखील समजून घेण्याची गरज असते.

कोणते समभाग तेजीत

2026 मध्ये ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस या समभागांनी सर्वाधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. समभाग 52 टक्के इतका तेजीत राहिला आहे. या पाठोपाठ सोलार इंडस्ट्रीजचा समभाग जवळपास 50 टक्के, भारत फोर्ज 48 टक्के आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसीशन फोर्जिंग्स यांनी 47 टक्के इतकी वाढ नोंदविली आहे. याच गटातील बंधन बँकने गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा दिला आहे. तर सिजी पॉवर 39 टक्के, बीएसईमध्ये 36 टक्के आणि फेडरल बँकेमध्ये 30 टक्के इतकी वाढ नोंदविली गेली आहे. सोबत अरबिंदो फार्मा 29 टक्के व बँक ऑफ महाराष्ट्र या समभागाने 28 टक्के तेजीसोबत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे 21, 29 टक्के इतके तेजीत राहिले आहेत. या निर्देशांकात वाढ होण्यामागे रिटेल गुंतवणूकदार कारणीभूत ठरले आहेत. त्यांनी या निर्देशांकातील समभागांमध्ये रस घेतला होता. मिड व स्मॉल कॅप गटात दुसरीकडे म्युच्युअल फंडस्मध्ये गुंतवणूक झालेली दिसून आली. आर्थिक वर्ष 2027 मध्ये पाहता मिडकॅपमध्ये भारत हेवी इलेक्ट्रीकल्स, लॉरस लॅब्ज, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट व गोदरेज प्रॉपर्टीज यांनी गुंतवणूकदारांना 61 टक्क्यापर्यंत परतावा दिल्याचे दिसून आले आहे.

Advertisement
Tags :

.