महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्व्हर दोषामुळे मायक्रोसॉफ्ट ठप्प

07:10 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतासह जगभरात विमानसेवांवर परिणाम : रेल्वे, बँका, शेअरबाजार, व्यक्तिगत संगणक कामकाजातही व्यत्यय

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मुख्य सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने संगणकावर आधारित जगभरातील सर्व सेवांवर विपरित परिणाम झाला आहे. भारतासह जगभरातील अनेक विमान कंपन्या, रेल्वेसेवा, सरकारी कार्यालये, बँका, वित्तसंस्था, शेअरबाजार, हॉटेले आणि पर्यटन व्यवसायांच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. शुक्रवारी सकाळपासूनच सर्वत्र प्रचंड गोंधळाला प्रारंभ झाला. अनेक सेवा ठप्प होण्याची ही समस्या जगभर निर्माण झाली. त्यानुसार विविध देशांमधील दीड हजारहून अधिक विमानो•ाणांवर परिणाम झाला. तसेच भारतात विविध विमानसेवा कंपन्यांना 200 उ•ाणे रद्द करावी लागली.

इंडियन एअरलाईन्स, इंडिगो, स्पाईसजेट इत्यादी भारतीय नागरी विमानसेवांवर या घटनेचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. इंडिगो आणि स्पाईसजेट या कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी एक पत्रक काढून प्रवाशांना या संकटाची कल्पना दिली. तसेच त्यांना त्रास झाल्यामुळे खेदही व्यक्त केला. विमान प्रवाशांनी विमानतळांवर नेहमीच्या वेळेपेक्षा आधी यावे. त्यांची तपासणी करण्यासाठी वेळ लागत आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी, अशा सूचना प्रवाशांना देण्यात येत होत्या.

बँका आणि इतर सेवा प्रभावित

बँका, वित्तसंस्था, शेअरबाजार, सेबी, पर्यटन व्यवसाय इत्यादींवरही मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये दोष उत्पन्न झाल्याने परिणाम झाला असून त्यांचे कामकाज धिम्या गतीने होत राहिले. अनेक तास अशी परिस्थिती राहिली. भारतात काही विमान उ•ाणे रद्द करावी लागली असून काही विमान उ•ाणांच्या वेळांमध्ये परिवर्तन करावे लागले. मुंबई शेअरबाजार, राष्ट्रीय शेअरबाजार, लंडन येथील शेअरबाजार तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, तैवान, जपान, जर्मनी आणि इतर महत्त्वाच्या देशांमधील शेअरबाजारांचे कामकाजही काही काळासाठी ठप्प झाले होते.

आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये गोंधळ

अनेक देशांमध्ये देशांतर्गत विमानसेवांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय विमानांच्या उ•ाणांच्या वेळापत्रकावरही या बिघाडाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. अमेरिकन, युनायटेड आणि डेल्टा या अमेरिकेतील विमान कंपन्यांनी आपल्या सर्व विमानांची उ•ाणे पुढील सूचनेपर्यंत रद्द केल्याची घोषणा केली आहे. ऑस्टेलियातही विमानांची उ•ाणे रद्द करण्यात आली. सिडनी आणि मेलबोर्न विमानतळ काही तास बंद करण्यात आले होते. अनेक देशांमध्ये अनेक विमानफेऱ्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले, तर अनेक विमानांचे मार्गही ऐनवेळी नवे करण्यात आले. हाँगकाँग विमातळावर संगणक बंद पडल्यानंतर प्रवाशांची मानवी तपासणी करण्यात येत होती. भारतातील काही विमानतळांवरही हाच मार्ग अवलंबिण्यात आला. स्पेनमध्ये बहुतेक विमानांच्या उ•ाणांना मोठा विलंब झाला. फ्रान्स, जर्मनी, लक्झेनबर्ग, रशिया, पोर्तुगाल, इटली, हंगेरी इत्यादी देशांनाही हाच अनुभव आला. जगभरातील शेअरबाजार काही काळ बंद झाल्याने गुंतवणूकदार संत्रस्त झाले.

दूरच्या देशांनाही त्रास

जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये असणाऱ्या छोट्या देशांमधील सेवाही सर्व्हरमधील दोषामुळे ठप्प झाल्याचे दिसून येत होते. आयर्लंड, आफ्रिकेतील देश, दक्षिण अमेरिकेतली पेरु, उरुग्वे आदी देश, तसेच आशिया खंडातील श्रीलंका, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, सिरीया, सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण आदी देशांमधील अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. मायक्रोसॉफ्ट सर्व्हरवर अवलंबून नसणाऱ्या सेवांमध्ये मात्र व्यत्यय निर्माण झाला नव्हता.

दिल्ली विमानतळ काहीकाळ बंद

जागतिक गोंधळाचा काही परिणाम दिल्ली विमानतळावरही झाला होता. या विमानतळावरील काही सेवा काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवीत आहोत. आवश्यकतेनुसार प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. प्रवाशांनी सातत्याने आपल्या विमानसेवा कंपन्यांच्या संपर्कात रहावे, असे मार्गदर्शन दिल्ली विमानतळाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते.

व्यक्तिगत संगणकही ठप्प

जगभरात मायक्रोसॉफ्टच्या ‘विंडोज’ या व्यवस्थेचा उपयोग करणारे शेकडो कोटी संगणक आहेत. या सर्व संगणकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या इंटरनेट सेवांना या सर्व्हर दोषामुळे बाधा पोहचल्याचा अनुभव कोट्यावधी खासगी आणि व्यक्तिगत संगणक उपयोगकर्त्यांना शुक्रवारी आला. कित्येक संगणक बंद पडले होते.

मायक्रोसॉफ्टकडून खेद व्यक्त

सर्व्हरमधील तांत्रिक दोषाची त्वरित नोंद मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून घेण्यात आली आहे. आम्ही हे दोष दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. टप्प्याटप्प्याने व्यवस्था दोषमुक्त करण्यात येत आहे. हा दोष का निर्माण झाला, याचा शोध घेतला जाईल आणि उत्तरदायित्व निश्चित केले जाईल. यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. जगभरातील सेवाग्राहकांना या तांत्रिक दोषामुळे जो त्रास आणि असुविधा सहन करावी लागली, त्याचा आम्हाला खेद आहे, असे वक्तव्य मायक्रोसॉफ्ट कंपनीने एका निवेदनाद्वारे शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध केले आहे.

टीव्ही नेटवर्कस् प्रभावित

केवळ विमानसेवा आणि वित्तसेवाच नव्हे, तर टीव्ही नेटवर्कनाही सर्व्हर डाऊनचा त्रास सहन करावा लागला. अनेक वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या आणि टीव्हीवरील इतर कार्यकमांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. अनेक टीव्ही वाहिन्या अनेक तास बंद ठेवाव्या लागल्या होत्या. संगणकआधारित आणि विशेषत: विंडोज आधारित सर्वच सेवा आणि उद्योग व्यवसायांना या तांत्रिक दोषाचा फटका सहन करावा लागल्याने जगभरात प्रचंड गोंधळ आणि अनागोंदी झाल्याचे दिसून आले.

‘क्राऊडस्ट्राईक डाऊन’मुळे समस्या

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या जगप्रसिद्ध ‘विंडोज’ या संगणकीय ऑपरेटिंग सिस्टिमला सायबर सुरक्षा पुरविणाऱ्या ‘क्राऊडस्ट्राईक’ या जगव्यापी प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने जगभरात ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जे उद्योग-व्यवसाय किंवा सेवा तसेच खासगी संगणक उपयोगकर्ते प्लॅटफॉर्मशी संलग्न आहेत, त्या सर्वांना या दोषामुळे त्रास सहन करावा लागला आहे.

संगणकीय सेवांमध्ये मोठा व्यत्यय

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article