महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मायक्रोसॉफ्टचे अँड्राईडकरीता एआय अॅप लाँच

06:47 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जीपीटी 4 मॉडेलमध्ये विनामूल्य प्रवेश मिळणार : चॅटबॉट हाआतापर्यंतचा बिंग शोध

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन को-पायलट अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे, वापरकर्ते त्यांच्या एआय चॅटबॉटचा वापर नवीन सेवा म्हणून करू शकतील. हे अॅप सर्च इंजिन बिंगपेक्षा वेगळे आहे आणि ते पूर्णपणे मायक्रोसॉफ्टच्या एआय तंत्रज्ञानावर आधारित आहे.

मायक्रोसॉफ्टने काही महिन्यांपूर्वी बिंग चॅटचे नाव बदलून को-पायलट केले. सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टचे एआय हे बिंग शोध इंजिनचा एक भाग होते. ज्याचा शोध परिणाम इंटरफेस चॅटजीपीटी सारखा दिसत होता. हे वैशिष्ट्या अद्याप उपलब्ध आहे, परंतु मायक्रोसॉफ्ट एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म म्हणून को-पायलटचा प्रचार करत आहे

5 हजारांहून अधिक डाउनलोड

नवीन को-पायलट अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून 5 हजारांहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. सध्या त्याची आयओएस आवृत्ती उपलब्ध नाही, परंतु कंपनीच्या म्हणण्यानुसार ते लवकरच उपलब्ध होईल. तोपर्यंत, आयओएस वापरकर्ते बिंग अॅपवर को-पायलट वैशिष्ट्या वापरू शकतात.

मायक्रोसॉफ्ट को-पायलट काय करतो?

कार्यक्षमतेबद्दल बोलायचे तर, या मायक्रोसॉफ्ट को-पायलटमध्ये चॅट-जीपीटीसारखी वैशिष्ट्यो...

?हे ओपन एआयच्या नवीनतम जीपीटी-4 मॉडेलमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान

?अॅप तुम्हाला चॅटबॉटशी संवाद साधण्याची परवानगी देते.

?डेल ई 3 च्या मदतीने, ते प्रतिमा तयार करण्यास तसेच ईमेल लिहिण्यास आणि कागदपत्रे तयार करण्यात मदत करते.

?मायक्रोसॉफ्टच्या या असिस्टंटमध्ये व्हॉईस इनपुट देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

?ऍक्सेस करण्यासाठी, इमेज व टेक्स्ट इनपुटचा पर्याय देखील अॅपमध्ये.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#tarun
Next Article