मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य 249.40 लाख कोटींच्या घरात
कंपनीची पहिल्यांदाच उच्चांकस्थानी झेप : प्रथमस्थानी अॅपल कायम
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायव्र्रोसॉफ्टने जवळपास 249.40 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यावर झेप घेतली आहे. बुधवारच्या सत्रात शेअर बाजारात 1.7 टक्क्यांची उसळी घेतली आणि समभाग 33,675 रुपयांवर पोहोचला. हा आकडा पहिल्यांदाच कंपनीने प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे. या कामगिरीची नोंद करण्यात आल्यानंतर काहीवेळ समभाग हा 33,472 च्या पातळीवर येत बंद झाला.
अॅपल राहिली अव्वल
बाजारमूल्याच्या यादीचा विचार करता अन्य कंपन्यांसोबत तुलना केल्यास मायक्रोसॉफ्ट दुसऱ्या स्थानी राहिली आहे. मूल्याच्या संदर्भातील आकडेवारीची गोळाबेरीज केल्यास यामध्ये अॅपल या यादीत अव्वल स्थानी राहीली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑईल अॅण्ड गॅस कंपनी सौदी अराम्को राहिली. चौथ्या स्थानी गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेट आणि पाचव्या स्थानी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनची वर्णी लागली आहे. ट्रेडिंगच्या दरम्यान अॅपलचे समभाग हे 0.35 टक्क्यांनी प्रभावीत होत 16,171 वर बंद झाले आहेत. मायक्रोसॉफ्टोने चॅट जीपीटी बनविणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. यात जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स बेस्ट चॅटबॉट रोलराऊट करणारी कंपनी पहिल्या दोनमध्ये असणाऱ्या कंपन्यांच्याही पुढे गेली आहे. ओपन एआयच्या मदतीने आपले सर्च इंजिन बिंगचा नवीन आणि जादा अपग्रेड व्हर्जनही सादर केला आहे.
अँड्रॉईड ग्राहकांना अॅप
मायक्रोसॉफ्टने अँड्रॉईड ग्राहकांकरीता नवीन को पायलट अॅप सादर केले आहे. या अॅपचा वापर करुन एआय चॅटबॉटला एक नवीन सर्व्हिसचा वापर करता येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. हे अॅप सर्च इंजिन बिंगपासून वेगळे आहे. आणि संपूर्ण मायक्रोसॉफ्टशी एआय तंत्रज्ञानाशी संबंधीत राहणार असल्याची माहिती आहे.