For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायक्रोप्लास्टिकमुळे पुरुषांना हृदयाघाताचा धोका अधिक

06:51 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायक्रोप्लास्टिकमुळे पुरुषांना हृदयाघाताचा धोका अधिक
Advertisement

धमन्यांमध्ये जमा होत आहेत सुक्ष्म करण

Advertisement

प्लास्टिक आधुनिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा ठरला आहे. परंतु याचे अत्यंत सुक्ष्म कण मायक्रोप्लास्टिक मानवी आरोग्यासाठी गंभीर धोक्याच्या स्वरुपात समारे येत आहेत. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, रिव्हरसाइड (यूसीआर)च्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या नव्या संशोधनातून मायक्रोप्लास्टिक धमन्यांमध्ये सूज आणि प्लाकची प्रक्रिया तीव्र करू शकते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या आजारांची जोखिम वाढत असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे अध्ययन यामुळे देखील महत्त्वपूर्ण आहे कारण हा प्रभाव विशेष स्वरुपात पुरुषांमध्ये अधिक स्पष्ट दिसून आला आहे.

यूसीआराच्या वैज्ञानिकांनी अशा उंदरांवर प्रयोग केला, ज्यात आनुवांशिक स्वरुपात हृदयरोगाचा धोका अधिक होता, या उंदरांना कमी कॅलरीज आणि कमी कोलेस्ट्रॉल असलेले भोजन देण्यात आले, जेणेकरून परिणाम पारंपरिक जोखीम घटक म्हणजेच स्थुलत्व किंवा उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नसावा हे सुनिश्चित करता येईल. जवळपास 9 आठवड्यांपर्यंत या उंदरांना दररोज मायक्रोप्लास्टिकचे एक मर्यादित प्रमाण देण्यात आले, जे माणसांना भोजन अन् पाण्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या संभाव्य स्तराच्या नजीक होते.

Advertisement

एनवायरमेंट इंटरनॅशनल नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनाचे निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहेत. नर उंदरांमध्ये हृदयानजीक स्थित प्रमुख धमनीमध्ये प्लाकची निर्मिती जवळपास 63 टक्क्यांपर्यंत वाढली. तर दुसऱ्या अन्य मोठ्या धमनीत प्लाकचे प्रमाण 600 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे आढळून आले. याच्या उलट मादी उंदरांमध्ये समान मायक्रोप्लास्टिक संपर्कानंतरही धमन्यांमध्ये कुठलाच मोठा नकारात्मक बदल दिसून आला नाही. अध्ययनाची सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मायक्रोप्लास्टिकमुळे झालेले हे नुकसान वजन वाढण्याशी संबंधित नव्हते तसेच कोलेस्ट्रॉल स्तरामध्ये कुठल्याही वृद्धीशी. उंदर स्थुल झाले नाहीत आणि त्याच्या रक्तात वसाचा स्तरही सामान्य राहिला. याचा अर्थ मायक्रोप्लास्टिकने थेटपणे धमन्यांना जैविक स्तरावर नुकसान पोहोचविले, यातून याचा प्रभाव पारंपरिक हृदय जोखीम घटकांपेक्षा वेगळा आणि स्वतंत्र असल्याचे स्पष्ट होते.

पुरुषांवर प्रभाव अधिक

महिलांमध्ये असलेले एस्ट्रोजन हार्मोन काही प्रमाणापर्यंत हृदय आणि रक्तवाहिन्यांना सुरक्षा प्रदान करते असे संशोधकांचे मानणे आहे. याचबरोबर पुरुष आणि महिलांच्या पेशी सूज तसेच बाहेरील कणांबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. परंतु या लैंगिक अंतरामागील अचूक जैविक कारणांना समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

अशाप्रकारे कमी करा जोखीम...

मायक्रोप्लास्टिकपासून पूर्णपणे वाचणे सद्यकाळात अवघड आहे, परंतु जोखीम कमी केली जाऊ शकते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. प्लास्टिकच्या जागी काच किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर, एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकपासून अंतर राखणे, अत्याधिक प्रोसेस्ड भोजनापासून अंतर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यासारख्या पावलांद्वारे मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव बऱ्याचअंशी कमी करता येऊ शकतो.

Advertisement
Tags :

.