‘मायक्रोमॅक्स-फिसन’ची हातमिळवणी
भारतात स्टोरेज चिपसेट डिझाईनसह निर्मिती करण्याचे ध्येय
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मायक्रोमॅक्स आणि तैवानची स्टोरेज चिप कंपनी फिसन यांनी एमआयपीएचआय, स्थानिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘स्टोरेज चिपसेट मॉड्यूल्स’ डिझाइन करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन केला जाणार असल्याची माहिती आहे. मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, कंपनीने नोएडा प्लांटमध्ये उत्पादन सुरू केले आहे. शर्मा म्हणाले, ‘फिसन हे एनएएनडी कंट्रोलर आणि एनएएनडी स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये अग्रणी आहे. आम्ही भारतात एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत भागीदारी केली आहे, ज्यामध्ये मायक्रोमॅक्सचा वाटा 55 टक्के आणि फिसन 45 टक्के असेल. ते म्हणाले की कंपनी सर्व्हरसाठी स्टोरेज चिपसेट डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित करेल, जे कोणत्याही देशासाठी सुरक्षा आणि धोरणात्मक दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत.