For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातमध्ये मायक्रोचिप केंद्राचे उद्घाटन

06:58 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरातमध्ये मायक्रोचिप केंद्राचे उद्घाटन
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्था / साणंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साणंद येथे मोठ्या सेमीकंटक्टर निर्मिती प्रकल्पाचे (मायक्रोचिप) उद्घाटन केले आहे. हे निर्मिती केंद्र ’केन्स टेक्नॉलॉजी’ या कंपनीने स्थापन केले आहे. भारताने सेमीकंटक्टर उत्पादनाच्या पायाभूत निर्मिती निर्माण कार्यात वेगाने प्रगती चालविली आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानात भारताला अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी मी साणंद येथेच ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’च्या उत्पादन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आता मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी ‘केन्स टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या सेमीकंडक्टर उत्पादन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होत आहे. मात्र, केवळ योगायोक नाही. कारण गुजरातने इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात वेगाने प्रगती साध्य केली आहे. अशी अनेक उत्पादन केंद्रे या भागात स्थापन होत आहेत, अशी भलावण त्यांनी केली.

अमेरिकन कंपनीचे प्रथम केंद्र

मायक्रॉन टेक्नॉलॉजी ही अमेरिकन कंपनी असून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र स्थापन करणारी ती प्रथम अमेरिकन कंपनी ठरली आहे. तर मंगळवारी उद्घाटन झालेली केन्स टेक्नॉलॉजी’ ही कंपनी भारतीय आहे. या कंपनीच्या साणंद येथील उत्पादन केंद्रात सेमीकंटक्टर पॅकेजिंग आणि ‘इंटिलिजंट पॉवर मोड्यूल्स’ चे उत्पादन केले जाणार असून जगात निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.

‘आत्मनिर्भर’ होण्याची योजना

सेमीकंडक्टर आणि इतर उच्चतांत्रिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या संदर्भात आत्मनिर्भर होण्याची भारताची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भरता’ कार्यक्रमाचा तो एक भाग आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताने इलेक्ट्रॉनिक धोरणात अमूलाग्र परिवर्तन केले आहे. अनेक कंपन्या भारतात आपली केंद्रे स्थापन करण्यासाठी सज्ज होत आहेत.

100 अब्जांचे ध्येय

सध्या भारताची इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन उलाढाल 4 लाख 50 हजार कोटी रुपयांची आहे. ती या दशकाच्या अखेरपर्यंत 100 अब्ज डॉलर्स किंवा जवळपास 10 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे भारताचे ध्येय आहे. सध्याचा प्रगतीचा वेग लक्षात घेता हे ध्येय निश्चितच गाठले जाईल. भारताने यासाठी मोठ्या गुंतवणुकीची योजना केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

‘केन्स’ उत्पादन केंद्राची वैशिष्ट्यो...

एकंदर गुंतवणूक : 300 कोटी रुपये

उत्पादन क्षमता : 63 लाख 30 हजार युनिटस् प्रतिदिन

उत्पादन प्रकार : सेमीकंडक्टर पॅकेजिंग, ‘इंटिलिजन्स पॉवर मोड्यूल्स’

वैशिट्या : देशातील अशा प्रकारचे प्रथमच उत्पादन केंद्र

Advertisement
Tags :

.