महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मायकेल नेसर ऑस्ट्रेलिया कसोटी संघात

06:39 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

गोलंदाज अष्टपैलू मायकेल नेसरची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली आहे. आठ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये ही कसोटी मालिका होत आहे.

Advertisement

डिसेंबर 2022 मध्ये नेसरने शेवटची कसोटी खेळली होती. दीर्घकाळापासून त्याच्या कामगिरीतील सातत्य पाहून आम्ही नेसरला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला, या संधीचा तो पुरेपूर उपयोग करून घेईल, असे निवड समिती चेअरमन जॉर्ज बेली म्हणाले. या संघात वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचीही निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांना कमिन्स, स्टार्क, हॅझलवुड यांना दुखापत झाली तरच या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. पाक व विंडीजविरुद्ध झालेल्या एकूण पाचही कसोटीत कमिन्स, स्टार्क, हॅझलवुड यांनी भाग घेतला होता. पाकची मालिका त्यांनी जिंकली तर विंडीजची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. न्यूझीलंडमधील दोन कसोटींची मालिका 29 फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमधील सामन्याने सुरू होईल. 8-12 मार्चला दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च येथे खेळवली जाईल.

न्यूझीलंड मालिकेसाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियन कसोटी संघ : कमिन्स (कर्णधार), बोलँड, अॅलेक्स कॅरे, ग्रीन, हॅझलवुड, हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, मायकेल नेसर, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media
Next Article